• June 29, 2026

NPL-Tech

Noob Plays and Learns Technology

लिनक्स – एक ओळख

ByVikas Deshmukh

May 13, 2025 #Linux

मागील भागात (http://npl-tech.in/old-laptop-feeling-slow/) आपण पहिले की जर आपला विंडोज संगणक स्लो वाटत असेल तर आपण त्याला नव्या सारखे करून त्याचे आयुष्य वाढवू शकतो. मात्र तरी विंडोज च्या अंतर्गत कार्यप्रणाली मुळे त्याला तरी सुद्धा काही मर्यादा असतात. त्यात आपण पहिले की एवढे सगळे करून सुद्धा जर आपला संगणक फास्ट वाटत नसेल तर एक वेगळी संगणक प्रणाली आपण वापरू शकतो. 

आणि ती प्रणाली म्हणजे  

कुठलीही  नवीन गोष्ट ही सुरुवातीला अवघड वाटतेच, मात्र अभिनंदन. आपण जर हे एका क्रोमबुक किंवा अँड्रॉइड वर वाचत असाल तर आपण अगोदरच लिनक्स वापरात आहेत. हा ब्लॉग ज्या साईट वरून आपण वाचत आहेत तो सुद्धा लिनक्स वर आहे. (जगातील 80% पेक्षा अधिक वेबसाईट ह्या लिनक्स वापरतात). सांगायचा मुद्दा हा कि आज लिनक्स ही एक विकसित कार्यप्रणाली आहे.

लिनक्स एक open source (मुक्त आणि विनामूल्य) कार्यप्रणाली लाईनस टोरवाल्ड्स (Linus Torvalds) ह्या हेलसिंकी विद्यालयात संगणक शास्त्र शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने 1991 मध्ये विकसित केली.

लाईनस टोरवाल्ड्स – लिनक्सचा जनक

ही UNIX कार्यप्रणाली वर आधारित होती. त्याकाळी आणि अजून सुद्धा सर्व कार्यप्रणाली ह्या खाजगी मालकीच्या (Proprietary) आणि महाग होत्या. लाईनस ला एक अशी कार्यप्रणाली विकसित कार्याची होती जी कोणीही विनामूल्य वापरू शकतो आणि आपल्याला हवे असतील ते बदल आपल्या गरजेनुसार करू शकतो. म्हणूनच आज आपण जर लिनक्स बद्दल सर्च केले तर आपल्या उबंटू, फेडोरा, आर्च, मंजारो, गरुड, लिनक्स मिंट ह्या कार्यप्रणाली दिसतील (ज्यांना लिनक्स मध्ये डिस्ट्रो किंवा डिस्ट्रिब्युशन असले म्हटले जाते ) ज्या प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विकसित केल्या आहेत. मात्र रूढार्थाने त्या सर्वांचा पाया (ज्याला कर्नेल / kernel म्हणतात) लिनक्सच आहे. जगातील 80% वापरात असणारी अँड्रॉइड ही स्मार्टफोन कार्यप्रणाली सुद्धा लिनक्स वरच आधारित आहेत.   

एक काळ होता जेंव्हा लिनक्स फक्त टेकनिकल लोकांसाठी आहे असे समजले जात होते. आणि आज सुद्धा ती बऱ्याच यांची डेव्हलपर वापरतात, पण आजची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला जाणीव सुद्धा होणार नाही की आपण काही नवीन वापरतो आहोत. एवढी ती विकसित आणि user friendly झाली आहे.

लिनक्स – का वापरावे?

  • मुक्त कार्यप्रणाली : वर सांगितल्या प्रमाणे लिनक्स ही एक मुक्त कार्यप्रणाली आहे. अर्थात आपल्या संगणकासाठी वापरल्यास आपल्या कोणालाही शुल्क द्यावे लागत नाही (अर्थात आपल्याला हवे असल्यास आपण त्या डेव्हलपर ना हवे तेवढे डोनेशन देऊ शकता, पण सक्ती नाही)
  • Customisation: जर आपण अँड्रॉइड वापरत असाल तर आपल्याला ठाऊक असेल की प्रत्येकाची स्क्रीन ही वेगळी दिसते. किंवा आपण आपल्या स्क्रीन मध्ये आमूलाग्र बदल करू शकता. एवढेच नाही तर वेगवेगळ्या widget, third party add-on द्वारे वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शुद्ध शकता. ही सर्व लवचिकता त्यात लिनक्स मुळे आली आहे. जी विंडोज किंवा अँपल संगणकात सापडत नाही.
  • स्थैर्यता : लिनक्स आज बहुतांशी सर्व सर्व्हर मध्ये वापरली जाते कारण मूलतः ती फार स्थिर आहे. आपल्याला विंडोज च्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’ माहित असेलच ज्यात बऱ्याच वेळा एखादी गोस्ट करत असताना आपला संगणक अचानक एक ब्लू स्क्रीन दाखवून संगणक हँग होतो आणि आपल्याला तयाला परत स्टार्ट करावे लागते. लिनक्स मध्ये असे होण्याचे प्रमाण फार म्हणजे फारच कमी आढळते. होत नाही असे नाही पण त्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
    विंडोज मध्ये तुम्हाला बऱ्याच केला एखादे महत्वाचे काम करत असताना उपडेट करण्याचा मेसेज येतो आणि आपला संगणक अचानक रिस्टार्ट सुद्धा होतो. तसे लिनक्स मध्ये घडत नाही. तुम्हाला हवे तेव्हाच तुम्ही उपडेट करू शकता आणि केल्यावर सुद्धा आपल्याला आपला संगणक रिस्टार्ट करावा लागत नाही (अपवाद – जेंव्हा आपण आपले कर्नेल उपडेट करता).
    ह्यामुळेच असंख्य संगणक वर्षानुवर्षे सुद्धा आपल्याला रिस्टार्ट करायची गरज पडत नाही.
  • सुरक्षितता: लिनक्स मुळातच बरीच सुरक्षित मनाली जाते कारण त्यात व्हायरस प्रादुर्भाव हा फार क्वचित आढळतो. मुळात हि कार्यप्रणाली अशीच बनवली गेली आहे की ज्यात आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टी साठी वापरकर्त्याला पासवर्ड टाकावा लागतो त्यामुळे कुठलेही malware आपोआप कार्यरथ होत नाही.
    मुक्त कार्यप्रणाली असल्याकारणाने एखादे असुरक्षित कार्य सापडले तरी कोणीही त्याला समजून त्यावर उपचार सुचवू शकतो किंवा अमलात सुद्धा आणू शकतो.
  • स्पीड : मागील भागात आपण बघितले की विंडोज कार्यप्रणाली जशी जशी विकासात होत आहे, तशी तशी तिला जास्त रॅम ची गरज भासते आहे आणि तुम्हाला हार्ड डिस्क मध्ये सुद्धा भरपूर जागा लागते आहे. लिनक्स ही एक अत्यंत lean अशी पद्धती आहे ज्यामुळे त्याची रॅम आवश्यकता अतिशय माफक आहे. काही लिनक्स कार्यप्रणाली तुम्ही अगदी USB ड्राईव्ह मध्ये सुद्धा इन्स्टॉल करून वापरू शकता. काही लिनक्स डिस्ट्रो अगदी 2GB रॅम मध्ये चालण्या एवढ्या हलक्या (lightweight) असतात.
    लिनक्स च्या अंतर्गत प्रणालीत जे फाईल सिस्टिम वापरले जातात (उदा : EXT4, BTRFS वगैरे) त्यामुळे विंडोज सारखे त्यांना सुरळीत चालण्यासाठी डिस्क डिफ्रॅगमेंटेशन वगैरेची गरजच भासत नाही. एकाच वेळी असंख्या प्रोसेस ते लीलया पेलू शकते.
  •  गोपनीयता (Privacy): गुगल असो वा मायक्रोसॉफ्ट. आज ह्या प्रामुख्याने आपण जे काही आपल्या संगणकावर अथवा स्मार्ट फोन वर करतो, त्याची सर्व माहिती गोळा करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. लिनक्सची सर्वात मोठी तत्व हे वापरकर्त्याच्या गोपनीयते वर प्रेरित आहे. मुळात मुक्त आणि विनामूल्य कार्यप्रणाली असल्यामुळे वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीचा व्यावसायिक उपयोग करायची गरज भासत नाही.

ह्या भागात आपण पहिले की कसे आपण आपल्या जुन्या संगणकाला लिनक्स द्वारे नवा जन्म देऊन आपला खर्च बराचसा वाचवू शकतो. अर्थात जर आपण बरीच वर्ष विंडोज वापरात असाल तर लिनक्स आणि विंडोज ह्या मध्ये जे फरक आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे, आणि ते आपण पुढील भागात समजू शकता.

लिनक्स मध्ये अर्थात बरेच वेगवेगळे डिस्ट्रिब्युशन सापडतात ज्यांनी आपण कोणते नक्की वापरावे ह्या गोंधळात सुद्धा पडू शकता. मात्र ह्यावर उपाय म्हणू सर्व डिस्ट्रिब्युशन आपण इन्स्टॉल करण्या अगोदर USB मध्ये ट्राय करून पाहू शकता अन आपल्याला सोयीचे डिस्ट्रिब्युशन निवडू शकता. असे काही नवीन वापरकर्त्यांसाठी सोयीचे डिस्ट्रिब्युशन आम्ही पुढील भागात आपल्या सोयीसाठी सूचित करणार आहोत.